….अन महिलेने आपल्या मुलाचे नाव ठेवले सोनू सुद.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने देशात खूप मोठ्या प्रमान्त स्थलांतर झाले. आपल्या पोटा पाण्यासाठी आपले राज्य सोडून अनेकजन परराज्यात काम करण्यासाठी वास्तव्य करत होते. कोरोनामुळे लॉकडाउन घोषित केल्याने अनेकांच्या हातचा रोजगार गेला त्यामुळे त्यांच्याकडे आपली दैनदिन भूक भागविण्यासाठी काहीच नव्हते. अशा परिस्थितीत मजुरांनी स्थलांतर करण्यास सुरवात केली. 
मजुरांचे पायदळ होणारे स्थलांतर पाहून अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपआपल्या घरी जाण्यासाठी मदत करत आहे. हजारो कामगारांसाठी सोनू सूद देवदूत बनून पुढे आला आहे. सोनू सूदच्या या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतूक केले जात आहे. घरी पोहचवण्यासाठी लोक त्याचे आभार मानत आहे. यातच आता सोनूच्या मदतीचे आभार मानण्यासाठी एका महिलेने आपल्या नवजात बाळाचे नाव चक्क सोनू सूद ठेवल्याचे समोर आले आहे. एका ट्विटर युजरने याबाबत माहिती शेअर केली. फरहान नावाच्या ट्विटर युजरने सांगितले की, गर्भवती महिलेला मुंबईवरून दरभंगा जायचे होते. अशा स्थितीमध्ये सोनू सूदने त्यांची मदत केली. सोनूच्या मदतीमुळे महिला दरभंगाला पोहचू शकली. आता त्या महिलेने आपल्या बाळाचे नाव सोनू सूद ठेवले आहे. सोनू सुदने देखील या ट्विट ला उत्तर देतांना हे आपल्या आयुष्यातील सर्व्वोत्तम पुरस्कार असल्याचे सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *