….अन त्याचे कारण ऐकून न्यायाधीशांच्या डोळ्यात आले पाणी.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे हातावर आणून ताटावर खाणार्‍या मजुरांचे हाल होतांना दिसून येत आहे.  त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पोटासाठी चोरी करण्याची वेळ काहिंवर आली आहे.

बिहारमधील नालंदा जिल्ह्यात एक अशीच घटना घटना घडली. नालंदा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलाला चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. त्यानंतर त्याला न्यायालयात हजार करण्यात आलं. तेव्हा त्याने न्यायालयात जे उत्तर सांगितले ते ऐकून न्यायाधीशांच्या देखील डोळ्यात पाणी आले. सदर मुलाने आई उपाशी असल्यामुळे चोरी केल्याचे सांगितले असून त्याच्या वडिलांचा मृत्यू काही वर्षापूर्वीच झाला. त्यानंतर आईची परिस्थिती बिकट झाली. तिला स्वत:ची कामे करण्यासाठी आपल्या लहान मुलांवर अवलंबून राहावे लागते. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लहान मुलांवर असून लॉकडाउनमुळे काम मिळत नसल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला, असे त्याने सांगितले. ही सर्व हकीकत ऐकून न्यायाधीशांनी त्याचे कौतुक केले व आणि त्याला सोडून दिले. त्याचबरोबर त्याला आवश्यक असणार्या. सर्व सुविधा देण्याचे आदेशही दिले. त्याला घरी सोडण्यात आले असून त्याला धान्य व इतर सुविधा देण्यात आल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *