अखेर निर्भया प्रकरणातील आरोपी अडकले फासावर.

संपूर्ण देशाला हदरविणार्‍या  दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना आज पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहार जेलमधील जेल क्रं. तीन मध्ये चारही आरोपींना फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंह, अक्षय ठाकुर, विनय शर्मा, आणि पवन गुप्ताला फाशी देण्यात आली. गेल्या सव्वासात वर्षापासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतील निर्भयाला आज न्याय मिळाला.
दोशींना फासावर लटकविल्या नंतर डॉक्टरचं पथक जेलमध्ये जाऊन चारही दोशींचा मृत्यू झालीची पृष्टी केल्यानंतर दोशींचा मृतदेह दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आजच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असुन बलात्कारासारखे कृत्य करणार्यान नराधमांना फाशीच शिक्षा व्हायलाच पाहिजे अश्या भावना सर्वसामान्य लोकांमधून व्यक्त केल्या जात आहे. तसेच आजचा दिवस हा देशातील सर्व मुलींच्या नावे असल्याची भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केली. 

महाराष्ट्रातील राज्यसभेचे सातही उमेदवार बिनविरोध.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *