अंबुजा सिमेंट च्या विरोधात स्थानिक रोजगार प्रश्नी करणार माजी आमदार अँड संजय धोटे धरणे आदोलन…।

अंबुजा सिमेंट उद्योगानी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून बाहेर चे परप्रांतीय कामगारांना कामावर घेण्याबाबत स्थानिकामध्ये तिव्र असंतोष असून याबाबत अँड संजय धोटे यांनी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना आदोलनाची सुचना पत्र दिले असुन आज पासून ०७ दिवसानंतर गेटसमोर धरणे आदोलन सुरू करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी अनेकदा बैठका घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात आला नाही त्यामुळे हे पाऊल उचलत  स्थानिक भुमिपुत्र तथा स्थानिक कुशल ,अकुशल बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावात म्हणून हि भूमिका घेतली आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रातील ओद्योगिक कम्पनीच्या माध्यमातून स्थानिक युवकावर अन्याय करण्यात येत आहेत .कम्पनी व्यवस्थापनाद्रारा  भुमिपुत्राना ,प्रक्लपगस्ताना ,कुशल ,अकुशल युवकाना  सातत्याने नियमितपणे व कंत्राटी स्वरूपात घेणे बंधनकारक असताना त्यांना वंचित ठेवण्याचे काम कम्पनीच्या माध्यमातून होत आहेत. स्थानिक पातळीवर घेणे आवश्यक असताना शासन निर्णय असताना या संदर्भातील जाणीव असताना त्यांना  कामावर घेत नाहीत. त्यांना आपल्या हक्का पासून वंचित ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक पाहता या क्षेत्रात अंबुजा सिमेंट  कम्पनी असे अनेक उद्योग असताना या क्षेत्रातील युवक रोजगाराच्या संधी  मिळण्यासाठी प्रयत्न करित आहेत. कम्पनीच्या ठेकेदारांना याची जाणीव आहेत पंरतु ते स्थानिक युवकांच्या हाती काम न देता प्ररपातियाना कामावर घेण्यात आल्याचे दिसून येते. कम्पनीच्या माध्यमातून होणाऱ्या भरती प्रक्रिया मध्ये स्थानिकाना डावल्याचे काम सुरू आहे.मौजा उपरवाही तहसील कोरपना येथे स्थित असलेली अबुजा सिमेंट कम्पनी व्यवस्थापनाद्रारा सातत्याने कंटात्री व नियमित कामगाराची भरती केल्या जाते .अबुजा सिमेंट कम्पनीच्या व्यवस्थापनाने प्रकल्प  सुरू होताना  स्थानिक भुमिपुत्राना कंटात्री स्वरूपात कामात नियमित रोजगार उपलब्ध करून देण्याची व प्रकल्पग्रस्तांना  कम्पनी त कामावर  घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कम्पनी व्यवस्थापन ला आश्वासन ची जाणीव नसल्याचे स्पष्ट दिसून आले.  या  उद्योग कम्पनी मध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देत नसल्याचे निदर्शनास आले.  या कम्पनीच्या माध्यमातून स्थानिक युवकांना प्राधान्याने संधी उपलब्ध करून द्यावित .कम्पनीच्या अधिकारी याचे समेत नियोजित बैठक घेऊन तोडगा काढावा .अन्यथा या बाबतीत निदर्शने वा आदोलन करण्यात येईल . असा इशारा माझी आमदार संजय धोटे यांनी दिला आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *